प्रारब्ध की पुरुषार्थ? हा अनंत चर्चेचा विषय आहे. या सन्दर्भात ब-याच म्हणी देखील आहेत.असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी. ही संपूर्ण दैववादी विचारधारा आहे. जर प्रारब्धच सर्व काही असेल तर मग पुरुषार्थ कशाला? आणि जर पुरुषार्थानेच सर्व काही होऊ शकतं तर मग प्रारब्ध किंव्हा दैवाची भूमिका काय ?
खरं पाहिल्यास या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा आहेत. प्रारब्ध अनुकूल असलं तर पुरुषार्थ हा हवाच, आणि पुरुषार्थ झटून केला तरी प्रारब्ध देखील अनुकूल हवं. प्रारब्धाला सीमा आहे , पुरुषार्थाला नाहीं. योग्य प्रयत्न केल्यानंतर ही जेव्हां यश पदरांत पडत नाहीं तेव्हां योग्य क्षणांसाठी आपण निष्फल झालो असं वाटतं. पण खरं पाहता ते तसं नसतं. कुठलाच प्रयत्न कधीच निष्फल होत नसतो. तो नेहमी यशस्वीच असतो. आपल्याला अपेक्षित फल मिळालं नाहीं म्हणून तो प्रयास आपल्याला निष्फल वाटतो. पण प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक केलेला पुरुषार्थ आपल्याला विकसित करीत असतो. निश्चित ध्येया कडे जाण्यासाठी वाट सुलभ करून देत असतो. म्हणून प्रतत्न किंवा पुरुषार्थ महत्वाचा. आपण कुठल्या ही नामांकित व्यक्तिचं चरित्र पाहिलं तर आपल्याला आढळतं की त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात कठोर परिश्रम केलेले असतांत, तेव्हां कुठे त्यांना कीर्ति आणियस मिळतं. पण आपण नेमकं हेच लक्षात घेत नाहीं.
आपल्याला यश हवं असतं. माणूस हा मुळातच याचक वृत्तिचा. हातातलं भिक्षापात्र दिसतं पण मनातलं दिसत नाहीं. आपल्याला सगळं हवं असतं. यश, कीर्ति, सन्मान, सम्पदा पण या साठी करावे लागणारे प्रयत्न मात्र करायला नको असतांत. त्यासाठी आपण देवा जवळ हात पसरतो पण हे विसरतो की प्रयत्न केला तरच परमेश्वर मदत करतो विचार करा की एक विमानाला आभाळात भरारी घ्यायची आहे, पण त्या साठी रन वे वर धावण्याची त्याची तयारी नाही. मग ते वर जाऊ शकेल का ? वर उठण्यासाठी त्याला अगोदर रन वे वर धावायचा प्रयत्न करावा लागतो, तेव्हां ते आभाळाला गवसणी घालू शकतं.
‘प्रयत्न’ या शब्दाचा अर्थच मुळी प्रकर्षाने केलेला यत्न असा आहे. ध्येय निश्चित केल्या नंतर त्याला योग्य असे प्रयत्न झाले नाहीत तर यश मिळत नाही.ध्येयाचं शिखर गाठण्यासाठ प्रयत्नांच्या आणि पुरूषार्थाच्या पाय-या चढाव्याच लागतात.
‘होणं’ आणि ‘असणं’ या दोन्ही बिन्दुंमध्ये पुरूषार्थ आणि प्रारब्ध याचा कुठे तरी समन्वय असतो. पण माणसाला प्रयत्नाचा आळस असतो. मग या आळसाला ईश्वरावरील श्रध्देचं गोडसं नाव दिलं जातं. यश अपयशाचे खापर दैवावर किंव्हा देवावर फोडलं जातं. माणूस अविवेकी झाला की प्रमादी होतो. नसत्या उठाठेवीं मध्ये रंगतो. त्याचा आत्मविश्वास नाहीसा होतो. मनांत खूप विचार असतांत पण आचरण मात्र शून्य असतं. साधं जेवायचं म्हटलं तरी ताटातलं जेवण हातानं उचलून तोंडात भरवावं लागतं. मग यशाचं शिखर आपोआप कसं बरं मिळेल ? प्रारब्धाला दोष देण्यातच आयुष्य सरून जातं. आपण स्वत:ला मदत केली तरच ईश्वर देखील मदत करतो. म्हणून प्रयत्नाचे पूजन असावे. स्वत:वर श्रध्दा असावी. शेवटी ईश्वर म्हणजे काय ? सत्कर्म हेच ईश्वर, सत्प्रवृत्ति हीच ईश्वर पूजा. हे जेव्हां कळतं तेव्हां मंदिरातलं ईश्वरत्व विशाल होतं, पसरतं आणि आपल्या प्रयत्नांच्या पूजेला ईश्वरत्व प्राप्त होऊन ती यशस्वी होते.

(संकलित- माय मराठीतील सौ.जयश्रीजोशी यांचा आलेख)

लेबल:

 
प्रेषक : साईट प्रबंधन सोमवार, 19 मार्च 2007 4:23 pm.
अनेक तज्ज्ञांच्या मते आजचे युग हे संवाद क्रांन्तिचे युग आहे. एकमेकांशी संवाद साधण्याकरिता कधीही नव्हती इतकी साधने आज मानव जातीला उपलब्ध आहेत. परंतु जरा खोलवर विचार केला असता जाणवते की साधनांच्या निर्मितीत साध्यच कुठेतरी हरवून गेले आहे. संवाद या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द आहे Communication जो लेटिन भाषेतील Communis या शब्दा पासून तयार झाला. Communis म्हणजे to share तसेच परस्पर देवाणघेवाणीतून समाज बांधणे to build Community. यातून संवादाचे साध्य स्पष्ट होते. आपण संवाद नाती बांधण्यासाठी करतो. विविध व्यक्तिंना एकत्र करण्याचे माध्यम म्हणजे संवाद.
साधने असूनही जागतिक स्तरावर विसंवाद दिसण्याची कारणे आर्थिक, राजकीय तसेच सामाजिकही आहेत. परंतु आपल्या भोवतीच्या नात्यांच्या छोट्या परिधि मध्ये तरी आपल्याला संवाद दिसतो का ? काही समाजशास्त्रज्ञांच्या मते आज अनेक पारंपरिक संस्थाचे, नात्यांवे विघटन होत आहे. परंतु असे वाटते की नाती बांधण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची आन्तरिक उर्मी प्रत्येक माणसांत असते. तिच्या प्रकटीकरणाचे स्वरूप, कौशल्ये बदलू शकतात व बदलेल्या परिस्थितीत जर संवाद-कौशल्याची जाणीव झाली तर अनेक नात्यांमध्ये पुनश्च सुसंवाद जागा होऊ शकतो.
मूल जन्माला येतं ते संवाद साधतं. आपल्या रडण्यातून ते आपली खाण्याची, रक्षणाची, प्रेमाची गरज व्यक्त करतो. याचा अर्थ असा की जन्मापासून मृत्यु पर्यंत आपण संवाद करत असतो; परंतु समाजात वावरण्यासाठी इतर ज्ञानकौशल्यांचे शिक्षण देत असतांना संवादकौशल्याचे शिक्षण जाणीव पूर्वक होत असताना दिसत नाहीं. त्यांना गृहीत धरले जाते. संवादकौशल्यातील एक महत्वाचे कौशल्य म्हणजे ऐकण्याची कला. आपले कान ऐकण्याचे तांत्रिक काम करतात; परंतु त्यांची क्षमता आपण पूर्णपणे वापरत नाही. कान मिनिटाला ५०० ते ६०० शब्द ऐकू शकतात. मानवी बोलण्याचा वेग जास्तीत जास्त १२० ते १४० शब्द इतकाच असतो या मुळे ऐकता ऐकता आपण अनेक गोष्टी करू शकतो. ऐकणे म्हणजे फक्त शब्द ऐकणे नव्हे, तर या शब्दांच्या फेकी बरोबर बोलणा-या व्यक्तिच्या भावभावनांचे, हेतुंचे, व्यक्तिमत्वाचे आकलन म्हणजे ऐकणे. यासाठी केवळ कानांनी नव्हे तर आपल्या पंचांगांनी ऐकण्याच्या क्रियेमध्ये गुंतणे आवश्यक असते. एक लहान उदाहरण म्हणजे बोलते शब्द रागाचे, शिवीगाळीने भरलेले असूनही त्यातून प्रेम, आपुलकी, काळजी व्यक्त होऊ शकते; या उलट वरकरणी साध्या वाटणा-या शब्दांचा अर्थ अनेकदा वेगळाच असतो. म्हणून संपूर्णातून आकलनाचे व या आकलनाच्या reality check मधून आपले ऐकण्याचे कौशल्य वृध्दिंगत करणे गरजेचे आहे.
बोलणें हा संवाद कौशल्यचा दुसरा महात्वाचा पैलू. ऐकण्याचा अभाव जेवढा प्रचलित आहे तेवढाच बोलण्याचा अतिवापर. बोलण्याचे कौशल्य विकसित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे मर्यादा. याचा अर्थ अळी मिळी गुप चिळी असा नाहीं, तर व्यवस्थित ऐकून, समयोचित, प्रसंगोचित व व्यक्तिनुरूप बोलणे असा होतो. भाषा हे माध्यम आहे याची जाण ठेवून आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे मनांत ठरवून बोललो तर बोलणे निश्चित अधिक प्रभावी होते. समोरील व्यक्तिंना समजून घेऊन त्यानुसार आपल्या बोलण्याला आकार देणे तर फारच उत्तम.
नवीन संवाद माध्यमे आपल्याला नवनवीन आव्हाने देतात. जसे दूरध्वनी बोलण्याचे व कानानी ऐकण्याचे कौशल्य पणाला लावतो. अनेकजण दूरध्वनीवरून बोलताना हातवारे करतात; कोणाला पत्ता सांगताना हातात दिशानिर्देश देतात.. टेलीफोन या साधनास सम्पूर्ण व्यक्ति न दिसण्याच्या मर्यादा आहेत, त्याचा विचार करून आपण बोलायला हवे. व्हीडिओ, इन्टरनेट इत्यादि अनेक साधने आता प्रचलित हत आहेत. संवादकौशल्याला नित्य नवीन आव्हाने देत आहेत. या आव्हानांना सामोरी जात असतांनाच ऐकणे व बोलणे या मूलभूत कसबांच्या जोपासनेतूनच आपण आपले व्यक्तिमत्व आणि नाती अधिक विकसित करू शकू.

-डॉ. अमृता भिडे
(संकलित)

लेबल:

 
प्रेषक : साईट प्रबंधन 4:23 pm.
प्रसिध्द मनोविचारक एडलरच्या मान्यतेनुसार व्यक्ति समाजात आपली ओळख पटवून देण्यासाठी दोन दृष्ट्या प्रयत्न करतो. एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. सकारात्मक दृष्ट्या विचार करणारा व्यक्ति आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला वृध्दिंगत करण्यासाठी स्वत:च्या व्यक्तित्वाला आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात. समाजातील बहुसंख्य लोकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतात. लोककल्याणाच्या कार्यात स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. असे व्यक्ति आपल्या बुध्दि व परिश्रमाने असे रचनात्मक कार्य करतात ज्या मुळे त्यांची लोकप्रियता वृध्दिंगत होऊ शके. या विपरीत नकारात्मक विचारधारेचे व्यक्ति लोकप्रिय होऊ इच्छितात पण त्यासाठी कुठल्याही रचनात्मक कार्यात सहभाग करत नाही. असे व्यक्ति आपल्या संपन्नते मुळे किंव्हा ते ज्या पदावर काम करतात त्यामुळे लोकांनी त्यांचा जवळ स्वत: यावे अशी अपेक्षा ठेवतात. असे व्यक्ति अहंभावी असतात. अश्या व्यक्तिंना जेव्हां यथोचित सन्मान, लोकप्रियता मिळत नाहीं तेव्हां ते कुंठाग्रस्त होतात. अतिगर्वामुळे त्यांची इतरांशी संवादहीनता वाढते व ते हळू हळू एकाकी होतात.
पुढाकर न घेणे ही एक विकृत प्रवृति सध्या समाजात वाढत आहे. आज प्रत्येक जण ह्याच विचारात असतो कि मीच पुढाकार कां घ्यावा ? गरजू स्वत: माझ्या कडे येईल. समारंभात लोकं नटून थटून वावरत असतात पण एकामेकाशी न बोलता निघून जातात किंव्हा जे चार चौघे गप्पा करीत असतात ते सुद्धा स्वार्थापरी, असं आढळतं.
सहज आणि निस्वार्थ भावने खुशाली विचारण्या चा काळ संपत आहे. समाजात संवादहीनतेची एक साथच आली आहे. संवादासाठी स्वयंस्फूर्तिने पुढाकार न घेण्याच्या सर्वात मोठे कारण व्यक्तिवादी प्रभावाची तीव्रता आहे. आज मध्यम आणि उच्च वर्गातील बहुसंख्य लोक सुविधा संपन्न आहेत. अभाव व्यक्तिंना जवळ आणतो सुविधा आणि संपन्नते मुळे ते दूर जातात. त्यांची ही समज असते की त्यांना कुणाचीही आवश्यकता भासणार नाही. त्यांना हा गैरसमज असल्यामुळे समाजात संवादहीनता वाढत आहे. प्रकृतिने मानवाला वाक्-शक्ति दिली आहे ती सप्रयोजन आहे. वाक्-शक्ति आत्म उत्थान आणि परोपकाराचे एक सशक्त माध्यम आहे. गळ्याच्या केन्सरने पीडित स्वामी रामकृष्ण परमहंसाना डाक्टरने न बोलण्याचा सल्ला दिला तेव्हां ते म्हणाले – माझा जवळ वाणी हाच एक माध्यम उरला आहे ज्यामुळे मी लोकांना जोडू शकेन. तात्पर्य हे की आम्हालाच ठरवायचे आहे की समाजात कुठल्याही प्रकारे संवादहीनता नसावी।

- संकलित

लेबल:

 
प्रेषक : साईट प्रबंधन 4:23 pm.